Me Sahyadri |
Gram devataa Part 2 |
April 2016 |
Volume 3, number 5 |
Please use minimum 1280 pixel horizontal screen
resolution for viewing. Please be patient while all the images in
webpage are loaded. Please do not use the images for any commercial
use without permission. Text in Marathi and English is not exact
translation. Please give sufficient time to allow the photographs to load. Special thanks to Mr. Amey Joshi, Mr.Balasaheb Yelwande and Mr. Pankaj Gupta for very good assistance while making images, and to all those who helped me during the compilation and field work for the help and guidance. |
|
|
|
सह्याद्री (पश्चिम घाट) हा एक नैसर्गिक संपदेचा, वैविध्यतेचा, भौगोलिक व ऐतिहासिक ठेवा आहे. वाढत्या मानवी अतिक्रमणाचा, सह्याद्रीच्या विविध घटकांवर होणारा दुष्परिणाम भविष्यात आपल्यालाच धोका निर्माण करेल, यात शंका नाही. शुद्ध पाणी, हवा व उर्जा, भावी पिढीला मिळण्यासाठी, नंद्यांचे उगम असलेला सह्याद्री व त्याभागातील जंगले टिकवणे महत्वाचे आहे. सह्याद्रीच्या महत्वाच्या घटकांचे महत्व छायाचित्रांद्वारे प्रकट करण्याचा मी येथे प्रयत्न केला आहे. येथील पक्षी, प्राणी, वनस्पती, अधिवास, किल्ले व लेणी अशा विविध विषयांबद्दल आपण समजुन घेऊ.
|
|
Western ghats, or Sahyadri as we all call it as, is a treasure trove of spectacular landscapes, biodiversity, flora, fauna, some amazing geological wonders and manmade monuments. With the increasing pressure from human encroachment, all these elements are under stress and in turn are under depletion. Western ghats should be left untouched by human beings, to protect their future generations from getting short of resources, such as water, energy and clean air. The important elements of western ghats, which need protection are highlighted in the new version of Photo journal , Me Sahyadri Magazine. The various issues of journal have a brief of inspiring subjects such as birds, mammals, forts, ancient caves, snakes and the ambiance.
|
|
|
|
|
|
Me Sahyadri – April 2016 - Gram Devataa - Part 2
|
|
|
माळरानावरच्या बारक्या टेकाडावरच्या देवळाबद्दल फार कुतुहल वाटायचे. डोंगराला वळसा घालत आगगाडी जाताना खिडकीतुन पहाताना असे कुतुहल नेहेमी वाटायचे. अशी माळरानावरची देवळ, घनदाट जंगलातील कौलारु देवळ, सुंदर खळखणाऱ्या नदी किनारी दगडी घाट असलेली देवळ, सह्याद्री च्या घाटमाथ्यांवर, उंच डोंगराच्या माथ्यावर, खिंडीत तर कुठे पायथ्याच्या गाववस्तीत असलेली देवाची ठाणी धुंडाळायची ठरली. कुठे इतिहासाच्या ओळखीच्या खुणा आढळल्या, तर कुठे मनात नविन प्रश्न उपस्थित व्हावेत असे अनुभव आले. असेच काही चांगले वाईट अनुभव मी इथे मांडले आहेत.
|
|
I was always curious about the small temples atop the barren hills in arid region. Often seen from the running trains, I wondered when I can visit one such temple. I decided to visit the small temples with the sloping roofs in the sacred groves, the small temples atop the barren hills, the small places of worship on the hill tops or in the mountain passes, some at the outskirts of the village. At some temples I found the essence of worship, the historical or past impression of worship. The experience of these visits is presented here using photographs and brief text.
|
|
|
|
|
1. Various Taaks, Sacred grove, near Dimbhe, Pune district, Western ghats, Maharashtra, India
|
|
|
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर वसलेले पेठेची वाडी हे दुर्गम गाव कलाडगड किल्याजवळ वसलेले आहे. येथील एका लहान देवळात ग्रामदेवतेचे ठाणे आहे. देवळात देवाचा पाट आहे. लाकडी पाटावर कोरिव काम आहे. पाटावर मोर, घोडे आणी इतर नक्षीकाम आहे. याच सारखे मोर व घोडे असलेले पाट घाटमाथ्यावरच्या देवळात आढळतात. येथे भैरवनाथ, देवी, व वाघ यांचे टाक पाटावर आहेत.
|
|
The temple in the remote village of Pethechi wadi in Ahmednagar district has this beautifully ornamented and well maintained Paat. There are few metal plaques (Taaks) there representing the goddess deity, Bhairavnath, and natural fauna such as dear and peacock.
The wooden God house (Paat) itself is beautifully ornamented with a pattern typical to the region. There are peacocks in the background and horse on the sides. Importance of the horses in the community in the past can be seen in this art work. The rest of the carving art work on the wood is almost similar to what is seen in the Paats even in Pune district.
|
|
|
|
|
|
2. Village deity, Nigade caves, Nigade village, , Pune district, western ghats, Maharashtra, India
|
|
|
लेण्यांच्या जवळ पाण्याच्या टाक्यांजवळ एक देवाचे ठाणे आहे. पदुबाई किंवा पद्मावती देवीचे एक लहान दगडी देऊळ आहे. त्याच्या बाजुला जुनी शिल्प आहेत. एक शिल्प वाघाचे असुन ते दगडी आहे. तर दुसरे शिल्प नीट ओळखु येत नसले तरी ते देवीचे लाकडावर कोरलेले चित्र असावे. या शिल्पांना शेंदुर फासल्यामुळे त्याच्या मुळ रुपाची प्रचिती येत नाही. देवळासमोर एक निवडुंग आहे. त्याला रंगीत वस्त्र नेसलेली आहेत. असा प्रकार पुणे जिल्ह्यात इतरत्र बऱ्याच ठिकाणी आढळतो. तसुबाई डोंगररांगेत असलेल्या या निगडे गावाजवळच्या लेण्यांमध्ये फारसे कोरिव काम नाही. पुरातन काळात या डोंगररांगेत वस्ती असावी असा एक तर्क आहे. लेण्याच्या आजुबाजुस सुरक्षेसाठी कुंपण असावे अश्या काही खुणा व पाण्याची टाकी येथे आहेत.
|
|
What looks like the original figurine of the Goddess deity, is now seen outside the small temple of Goddess Padubai or Padmavati. The wooden plank with roughly carved figurine of the goddess is accompanied by another deity, the tiger like fauna carved on the rock. Both these deities are daubed saffron with minium. The main deity in a small temple adjacent to these deities, is a goddess Padubai, a oval stone daubed with minium. A cactus outside at the cliff edge is often drapped with the colorful saris. The cactus here is not removed but is ornamented in this way. This practice is often seen at such places of worship elsewhere in Pune district. These caves located on the scarp of Tasubai hill range, near village Nigade probably housed highlanders who for some reason felt safe highland as compared to the low land.
|
|
|
|
|
|
3. Deity on the mound of lateritic stones, Patherpunj, Satara district, western ghats, Maharashtra, India
|
|
|
सातारा जिल्ह्यात चांदोली अभयारण्यात पाथरपुंज नावाचे गाव घाटमाथ्यावर वसलेले आहे. या गावाबाहेर जांभ्याच्या दगडांच्या राशीवर एक स्तंभ आहे. या स्तंभाला वस्त्र नेसलेली असुन डोक्यावर पागोटे आहे. गावकरी याला चेटुक असे संबोधतात. मात्र याचा जादुटोणा प्रकाराशी संबंध नाही. गावकरी या देवाला फारसे पुजत नसले तरी आजुबाजुच्या गावांमधुन बरेच लोक येथे देव दर्शनासाठी येतात. नवस बोलतात. नवस फिटवण्यासाठी परत येतात. या प्रकारातुन गावात प्राथमिक पातळीची सुधारणा झाल्यामुळे गावकरी या देवावर खुश आहेत. विशेष म्हणजे गावाच्या "पाथरपुंज" या नावात या देवाचा उल्लेख स्पष्ट होतो. दगडांचा ढिग असा या प्राचिन नावाचा अर्थ लागतो. या गावात जाण्यासाठी वन खात्याची परवानगी लागते. येथे हेळवाक गावावरुन एक दुर्गम वाट गाडी वाट आहे.
|
|
The local deity of village Patherpunj, again a village at Ghatmatha, in Satara district is one amazing example of stone age deities. The deity here is a pole draped in colorful cloth and mounted with a head gear on top. The pole representing the deity is fixed on a mound of lateritic stones. The local villagers call it “Chetuk”. Though the word is synonymous with black magic, today no such practice exists here. But the name suggests some such practice in the past. The otherwise outdated deity has suddenly gained lot of popularity and garners lot of privilege due to the visitors coming here from far away towns and villages. The fact that the people from outside the place continue to visit and worship this deity more than the local villagers suggest the popularity in the past. Now this village is inside Chandoli National Park. Only with permission of forest dept one can reach here after travelling on a treacherous off road. The villagers here are happy with the deity as it has brought lot of welfare and development to the village due to the visitor worshipers.
|
|
|
|
|
|
4. Wooden carved bracket, Shiva temple, near Rajgurunagar, Pune district, western ghats, Maharashtra, India
|
|
|
पेशवे कालीन वाड़्यांमध्ये व देवळांमध्ये आढळणारे लाकडी कोरिव काम येथे देवळात आढळते. अहिल्याबाई होळकरांनी स्थापन केलेल्या डोंगरावरच्या देवळाजवळ पाण्याचे मोठे टाके, चुन्याचा घाणा व दिपस्तंभ आहे. देवळात पुर्वी काही भित्तीचित्रे होती. इंग्रजांनी केलेल्या नोंदींमध्ये याचा उल्लेख आढळतो. दुर्दैवाने येथे असलेल्या जवळच्या गावाचे स्थलांतर झाले. चास कमान धरणाच्या जलाशयात मुळ गाव पाण्याखाली गेले. जिर्णोद्धारात येथे गावकर्यांनी भिंतींवर चुना फासला. या प्रकारात मुळ चित्रे नष्ट झाली.
|
|
This wooden bracket ornamentation can be seen in most of the wadas (old wooden framed mansions) and temples. The beautiful carving work can be seen here in one of the old temples on the hill near Rajgurunagar, established by Ahilyabai Holkar. Unfortunately most of the precious art work particularly some paintings have been lost as the local villagers have whitewashed the walls of this temple.
|
|
|
|
|
|
5. Carved tiger mural, Wada village, Pune district, western ghats, Maharashtra, India
|
|
|
उत्तरेकडच्या पश्चिम घाटातुन (पुणे, नाशिक, नगर जिल्हा) पट्टेरी वाघ नामशेष झाला आहे. दोन अडिचशे वर्षांपुर्वी ची शिल्प पहाताना, बऱ्याच ठिकाणी वाघाची शिल्प आढळतात. काही ठिकाणी शरभ या काल्पनिक प्राण्याची शिल्प आढळतात. देवीचे वाहन म्हणुन वाघाची पुजा केली जाते. हल्ली बऱ्याच ठिकाणी रंगवलेला पट्टेरी वाघ गाव देवळांमध्ये आढळतो. गडदुबाईच्या देवळात असाच वाघ भिंतीवर रंगवलेला आहे.
|
|
The spectacular enigma of the Royal Bengal Tiger can be still seen in the form of deity in most of the north western ghats. The forests, grasslands and swamps in low land area must have served as an amazing habitat for this majestic animal in the past. As the mankind ruled this region first as highlander on the hills, and then as the lowlander slowly displaced the fauna with the iron age.
|
|
|
|
|
|
6. Worshipper , Wada village, Pune district, western ghats, Maharashtra, India
|
|
|
दगडी भिंतीवर कोरलेले हे चित्र राजगुरुनगर जवळच्या एका लहान मंदिरातले आहे. उंच डोंगरावर एका नैसर्गिक कपारीत हे देवीचे मंदिर आहे. जुन्या मंदिराचा आता जिर्णोद्धार झाला आहे. या जिर्णोद्धारात रंगांमुळे उठुन दिसणारी अशी काही चित्रे येथे आहेत.
|
|
The worshiper with long hair, long ears is shown on the wall of the Gadadu-bai crevice temple near Wada. What was the old temple at the crevice is now modernised with a road to reach the top and is fast loosing the essence from past.
|
|
|
|
|
|
7. Saati Asaraa, Sacred grove, near Dimbhe, Pune district, western ghats, Maharashtra, India
|
|
|
साती आसरा चे टाक बहुतेक ग्राम देवळात दिसतात. नदी किनारी, पाण्याच्या स्त्रोताजवळ असलेल्या देवड़्यात त्यांची पुजा होते. गावतल्या स्त्रीया या देवींना पुजतात. साती आसरा एक प्रकारच्या पऱ्या असतात. त्यांची पुजा केल्यामुळे स्त्रीयांना वरदान मिळते अशी समजुत आहे.
|
|
Sati Asara is deity often seen in the rural India. In Maharashtra, the deity is worshipped in rural region by women seeking for their well being and welfare. Often the metal plaques (Taks) are seen in small temples around the village. In some metal plaques the seven Sati Asara are accompanied by their brother Joting. These Sati Asaraa are king of fairies or “Parya” . These deities are often connected with the rivers and water sources.
|
|
|
|
|
|
8. Waghjai deity, Kule village sacred grove , Pune district, western ghats, Maharashtra, India
|
|
|
माडाला लाजवतील अशी उंच उत्तुंग जांभळाची झाड, गावापासुन दुर उंचावर टेकाडावर जंगलात असलेली कुळ्य़ाची देवराई, वाघजाई चा तांदळा, त्यावरची घुमटी, मोहाच्या बियांचा पडलेला सडा असा इथला साज आहे. एका बाजुला मान वर करायला लावणारे जांभळाचे वृक्ष तर दुसरीकडे थरमॉकोल, प्लॅस्टिकचा कचरा दिसला.
|
|
Gigantic Jamnun trees adorn this sacred grove near Kule village. There are few Madhica Indica tree as well. In the sacred grove there is a stone goddess Waghjai. However the growing pollution due to plastic and thermocol can be seen in the sacred grove.
|
|
|
|
|
|
9. Tiger Taaks , Ahupe sacred grove, Pune district, western ghats, Maharashtra, India
|
|
|
वाघाचे टाक बहुतांश देवराईतल्या देवळात आढळतात. अहुपेच्या देवराईत वाघाच्या टाकांची पुजा भैरोबाबरोबर केली जाते. इथले देवाचे पाट जीर्ण झालेले असले तरी त्यावरच्या नक्षीकामाचा पुसटसा अंदाज बांधता येतो. जंगलाच्या जवळ वसलेले हे गाव भीमाशंकर अभयारण्यात वसलेले आहे.
|
|
The tiger metal plaques (Taaks) are worshipped in many sacred groves in western ghats. The sacred grove at Ahupe has traces of such worshiping. Not to mention the frequent encounters with the leopards indicate the probable indication of the man-animal conflicts that have happened in this region. Today the village in the Bhimashankar wildlife sanctuary.
|
|
|
|
|
|
10. Shiva temple, near Rajgurunagar, Pune district, western ghats, Maharashtra, India
|
|
|
चास कमान धरणाजवळ एका डोंगरावर हे शंकराचे देऊळ आहे. पेशवे कालीन वाड़्यांमध्ये व देवळांमध्ये आढळणारे लाकडी कोरिव काम येथे देवळात आढळते. अहिल्याबाई होळकरांनी स्थापन केलेल्या डोंगरावरच्या देवळाजवळ पाण्याचे मोठे टाके, चुन्याचा घाणा व दिपस्तंभ आहे. देवळात पुर्वी काही भित्तीचित्रे होती. इंग्रजांनी केलेल्या नोंदींमध्ये याचा उल्लेख आढळतो. दुर्दैवाने येथे असलेल्या जवळच्या गावाचे स्थलांतर झाले. चास कमान धरणाच्या जलाशयात मुळ गाव पाण्याखाली गेले. त्यानंतर येथे गावकर्यांनी भिंतींवर चुना फासला. या प्रकारात मुळ चित्रे नष्ट झाली.
|
|
The Shiva temple on the hill supposed to be set up by Holkars, today has modern wooden and rock sculptures of lord shiva and Parvati. The original temple from 18th century is now modernized and has various deities inside the temple. The paintings from 19th century are now lost and have been whitewashed by the local villagers unaware of the importance of the paintings. The village itself got submerged in the Chas-Kaman irrigation project and is now have been shifted away from this temple.
|
|
|
|
|
|
11. Bhairi, Gadad, Pune district, Western ghats, Maharashtra, India
|
|
|
पुण्याच्या वायव्य दिशेला भामा खोऱ्यात गडद नावाचे लहान गाव, तसुबाई डोंगररांगेच्या उत्तरेकडच्या कड़्याखाली वसलेले आहे.लांब लचक पूर्व पश्चिम पसरलेली तसुबाई डोंगररांग इंद्रायणी व भामा खोऱ्याला विभागते. तब्बल ३२ किमी लांबीच्या तसुबाई डोंगररांगेच्या पुर्वेस भामचंद्र डोंगर तर पुर्वेस वांद्रे खिंड आहे. या डोंगररांगेत भामचंद्र लेणी, निगडे लेणी, गडद लेणी, कल्हाट लेणी, चक्रेश्वर, तसुबाई, नवलाखचा भैरोबा, सटवाई, येसुबाई, कळमजाई अशी प्रत्येक गावाजवळ देवस्थाने व लेणी आहेत. डोंगररांगेच्या उत्तर बाजुस उंच कड़्याखाली वसलेले या गावात इतिहासाच्या पाउलखुणा आहेत. काही घरांच्या जोत्यात तर चक्क विरगळी दिसतात. गावाच्या दक्षिणेला डोंगराच्या बाजुस एक भैरवाचे मंदिर आहे. मंदिराभोवती असंख्य साध्या विरगळी आहेत. दगडी घोडा, व्याघ्रशिल्पे, पादुकाशिल्प, दिपस्तंभ असा भलताच गुढ पण तेजस्वी शिल्पांचा साधा पसारा या मंदिराने आपल्या अवतीभोवती मांडला आहे. देवळामागे सुंदर देवराई आहे. डोंगराच्या ताशीव कड़्यावर एक अद्भुत लेणे आहे. देवराईतुन लेण्यापर्यंत उभा कडा (७० ते ८० अंश) असुन यावर अत्यंत अरुंद कोरलेल्या (फुट्भर) अंदाजे २०० पावट्या (पायऱ्या) आहेत. वाटेत एका ठिकाणी महादेवाची पिंड आहे. या पुढे कड़्यालगत एक लहान गुहा आहे. प्रस्तरारोहणाचा योग्य अनुभव असल्याशिवाय येथे जाऊ नये. या दुर्गलेण्याला पुर्वी प्रवेशद्वार असावे. त्याच्या खुणा कड़्याच्या टोकावर दगडात आढळतात. विहारास असलेल्या दाराच्या व भिंतींसाठी जमिनीवर केलेल्या काही खुणा येथे आढळतात. लेणी अलंकृत नाहीत. येथे नैसर्गिक भेगेत काही कोरलेले विहार, पाण्याची ३ टाकी, एक लहान दुर्गेश्वराचे ठाणे आहे. लेण्यात देवाचे ठाणे आहे. यात सर्पदेवता, भैरवनाथ, दुर्गेश्वर यांची शिल्पे आहेत. बाहेर व्याघ्रशिल्प आहे. वरुन समोरचा भामा आसखेड धरणाचा पाण्याचा फुगवटा, पलिकडे शिंगेश्वर व कुंडेश्वराची शिखरे दिसतात.
|
|
Gadad is a small village in the Bhama river valley, in Pune district. The village is located at the base of a Tasubai hill range. The village has a very beautiful sacred grove at the base of the hill. There is a Bhairavnath temple in the village. Around the temple there are several hero stones, in memory of the historical warriors. The hill behind the temple has steep precipitous cliff. The horizontal geological fault at the higher elevation on this precipitous cliff, there are few man made caves and water cisterns. There are traces that the cave complex was fortified in the past with ground markings of the controlled fort entrance. The main cave at the top is very crude without much ornamentation. There are several markings which suggest that the cave was having a front enclosure with door. The most astonishing aspect of this cave complex is the existence of large sized water cisterns. The size of water cisterns indicate that the cave complex at the top of a very difficult precipitous cliff was established to differentiate the occupants of the cave from the rest of the world below. The use of the caves to house the livestock is ruled out as the precipitous cliff cannot be climbed by the livestock. There are about 200 narrow steps along precipitous cliff. The climb is difficult and requires special efforts and climbing knowledge and is not suitable for amateur trekkers. There is a small temple of Durgeshwar, Bhairavnath at the top. There is also a tiger sculpture on one of the stones which house the small temple.
|
|
|
|
|
|
12. The marking on the temple wall, Karha plateau, Pune district, Western ghats, Maharashtra, India
|
|
|
कऱ्हा पठारावर वसलेल्या आंबळे गावात जुनी देवळे आहेत. त्यातल्या एका लहान खंडोबाच्या देवळावर एक चित्रे रेखाटलेले आढळते. चित्रात गाई दाखवलेल्या आहेत. या पठारावर शुष्क दगडाळ जमिन असुन पावसाळ्यात येथे गवत येते. फारशी शेती नसलेल्या या पठारावर पावसाळ्यात धनगर, गुराखी आपली जनावर चरवतात.
|
|
The temple wall marked with the cows shown indicating the wealth of cows on the mostly arid rocky grassland of Karha plateaue, suggests more importance of livestock as compared to agriculture. In the monsoon the plateau pastures are regenerated attracting the shephards with their sheeps and other livestock.
|
|
|
|
|
|
13. Tiger sculpture, Gadadubai shrine, near Wada, Pune district, Western ghats, Maharashtra, India
|
|
|
वाडा गावाजवळ डोंगरात एक कपार आहे. या कपारीत गददुबाईचे ठाणे आहे. आता येथे रस्ता पोहोचला आहे. देवळाचे व कपारीचे आधुनिक पद्धतीने बांधकाम झाले आहे. जुन्या खुणा पुसल्या गेल्या आहेत. गुहेत असलेल्या गडदुबाईच्या देवळात वाघ कोरलेला एक दगड शेंदुर फासुन पुजला जातो. वाघ हा या देवीचे वाहन आहे.
|
|
The crevice temple at Gadadubai cave near Wada village has the tiger as the mount of the goddess. Though the temple and cave is highly modernized now, there are traces from the past such as this tiger marking engraved on the stone.
|
|
|
|
|
|
14. Metallic plaques from sacred grove temple, near Dimbhe, Pune district, Western ghats, Maharashtra, India
|
|
|
देवराईत दोन पाण्याच्या विहिरी आहेत. देवळात दोन पाट आहेत. दगडी पाटावर (शाळुंकेवर) सात गोल दगड आहेत. येथे साती आसरेचा टाक पुजला जातो. बाजुच्या लाकडी पाटावर अश्वारुढ भैरोबाचे व वाघाचे टाक पुजले जातात. देवळाबाहेर जमिनीत गाडलेल्या वीरगळी आहेत.
|
|
Apart from the Saati asaraa worship , the small temple in sacred grove also has the metallic plaques of Bhairoba deity and tiger. The place of worship is simple with two large water wells around the temple. There are couple of hero stones, partially underground in front of the temple.
|
|
|
|
|
|
15. Small Shiva temple, Pateshwar, Satara district, Western ghats, Maharashtra, India
|
|
|
पाटेश्वर/पाठेश्वर मंदिर समुह साताऱ्याच्या पुर्वेस डोंगरावर आहे. या समुहात प्रामुख्याने, माथ्यावरचे मुख्य देऊळ, पुर्वेकडचे वऱ्हाडाचे देऊळ आणी या दोन्ही मध्ये असलेला लेणी समुह हे तीन भाग आहेत. डोंगराच्या माथ्यावर असलेल्या या सुंदर मंदिरसमुहाचे वैशिष्ट्य येथील असंख्य शिव पिंडी, आणी येथील शांतता आहे.
|
|
Pateshwar or Patheshwar is a small temple complex located on a hill near Satara, Maharashtra. The temple complex consists of three zones. The old Shiva temple complex, rock cut caves and temples around caves and the main Shiva temple. Located high on the hill the most magnificence of the place is in the tranquility here with many interesting shiva linga and the other sculptures.
|
|
|
|
|
|
16. Worshiper mural, Wada village, Pune district, Western ghats, Maharashtra, India
|
|
|
|
|
|
17. Ornamentation, Nirgude temple, Pune district, Western ghats, Maharashtra, India
|
|
|
जुन्नर जवळच्या निर्गुडे गावात मारुतीचे मंदिर आहे. मंदिर १९व्या शतकातले असावे. येथे तीन शिलालेख आहेत. मंदिराच्या बाहेरच्या दगडी भिंतींवर कोरलेले अलंकार व नक्षीकाम आहे.
|
|
The village of Nirgude near Junnar has a recent 19th century temple. The temple has hanuman deity. There are 3 inscriptions in the temple. Some ornamentation can be seen on this temple.
|
|
|
|
|
|
18. Ram temple, Navlakh Umbre village, Pune district, western ghats, Maharashtra, India
|
|
|
अश्मयुगात कोकणातुन आलेला माणुस ढाक मार्गे तसुबाईच्या डोंगररांगेत येऊन वसला असाव असा तर्क आहे. तसुबाईच्या डोंगररांगेत असलेल्या उंचावरच्या देवांच्या ठाण्यांवरुन व लेण्यांवरुन असा अंदाज बांधला जातो. त्या काळात खालच्या पठारांवर जंगल, दलदल असावी. नंतरच्या काळात माणुस शेती करु लागला. धातुची अवजारे बनल्यानंतर त्याला येथील जमिनीवर नांगर चालवता आला. जंगलतोड झाली. दलदल बुजवली गेली. माणुस डोंगर उतरुन पठारांवर नदिकिनारी येऊन वसला. सुधा नदीकिनारी वसलेल्या नवलाख उंबरे गावात असेच काही घडले असावे. आज सुद्धा गावकरी जवळच्या उंच डोंगरावर वसलेल्या भैरवाला पुजतात. ढाकपासुन वाटेवरच्या सर्वच देवाच्या ठाण्यांना ते भेट देतात. ढाकच्या भैरीवर या गावकऱ्यांची अपार श्रद्धा आहे. गावात सुधेकाठी एक राम मंदिर आहे. मंदिरासमोर सुंदर पण साधी आरास आहे.
|
|
It is said that the villagers migrated from Konkan to hills near Navlakh Umbre highlands along the Tasubai hill range. Their deity is Bhairavnath. The cave at Dhak on the way from Konkan to Deccan plateau is still worshipped by the villagers from Navlakh Umbre, and they have special bond with this deity at the high caves at Dhak. The highland civilization can be seen on the Tasubai range. The range has many old temples and caves along its more than 25 km long spread. The old Bhairavnath temple at the highlands is still worshipped by the villagers. Now the highland village is displaced to the lower land at the emergence of Sudha river. The village has now a modern temple built around 200 years back on the bank of this small river. The sriram, Lakshman and Sita are worshipped in this temple.
|
|
|
|
|
|
19. Bhairavnath, Wagheshwar, Pune district, western ghats, Maharashtra, India
|
|
|
पवन मावळातल्या आजीवली गावाजवळ धरणाच्या जलाशयात वाघेश्वराचे जुने देऊळ आहे. दरवर्षी वर्षाचे सात महिने देऊळ पाण्याखाली बुडते. उन्हाळ्यात देऊळ पाण्याबाहेर येते. यादेवळात भैरवाचे एक अर्धवट कोरलेले शिल्प शिळेवर आहे. हे देऊळ जीर्ण झाले असुन बहुतांश पडलेले असुन उरलेला अंतर्भाग पडकळीस आलेला आहे.
|
|
The Wagheshwar temple near Ajivali in Pawana river basin is now in ruined condition. Every year the temple remains submerged for about 7 months in the backwaters, only to emerge in further depleted condition in summer. The ceiling of the temple has this slab with an incomplete carved face of Bhairavnath.
|
|
|
|
|
|
20. Goddess Shivai temple, Shivneri fort, Pune district, Western ghats, Maharashtra, India
|
|
|
जुन्नरच्या पश्चिमेकडे असलेल्या शिवनेरी गडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. या किल्ल्यावर बुद्ध लेणी आहेत. या लेणी समुहातील एका विहारात शिवाई देवीचे देऊळ आहे. या देवीच्या नावावरुन छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले.
|
|
Shivneri fort west of Junnar has ancient Buddhist caves. In one of the cave group facing South east, there is a large vihara, in which the temple of deity Shivai is located. The deity is named Shivai. The name of the King Chatrapati Shivaji Maharaj is named after this deity. The fort is birthplace of the king Chatrapati Shivaji Maharaj.
|
|
|
|
|
|
21. Goddess Padmavati deity, Tikona fort, Pune district, Western ghats, Maharashtra, India
|
|
|
तिकोणा किल्ल्यावर वरच्या भागात कातळात कोरलेली काही लेणी आहेत. येथील लेण्याचे द्वार उत्तरेकडे आहे. येथे असलेल्या चार विहारांपैकी एका गाभाऱ्यात तळजाई देवीची पुजाअर्चा होते. या गाभाऱ्याची उंची २.१ मीटर, लांबी २.१ मीटर व रुंदी २.२ मीटर आहे. द्वाराची रुंदी ०.७५ मीटर आहे. हि गाभाऱ्याची मोजमापे गडाच्या दक्षिणेकडे असलेल्या लेण्यांच्या गाभाऱ्याशी मिळत्याजुळत्या आहेत. गाभाऱ्यातल्या कोपर्यांना भिंतीपट्ट्या आहेत. गाभार्याच्या छतावर कोरलेले नक्षीकाम आहे. नक्षीकाम वर्तुळाकार असुन त्याचा व्यास १.५ मीटर व खोली उंदाजे ०.३६ मीटर आहे. गाभाऱ्यात मागच्या भिंतीवर एक कोरलेली मुर्ती (जैन ?) आहे. गाभाऱ्या बाहेर असलेल्या छतावर द्विपदरी एकुण १६ पाकळ्या असलेले पुष्प कोरलेले आहे. गडाच्या वर व गडाच्या खाली असलेल्या दोन लेणे समुहामध्ये काही प्रमाणात साधर्म्य आहे. हे लेणे इसवीसन नंतर सातव्या आठव्या शतकातले असावे असा अंदाज आहे.
|
|
There are caves at the top of the fort. These caves are facing north. There is a small carved cubicle. This cubicle is 2.2 meter wide, 2.1 meter in height and 2.1 meter in depth. There is a deity Goddess Taljaai in this cubicle. The cubicle ceiling has beautiful rock cut flower like carving. Outside the cubicle there is one more small carving of flower on the ceiling. The interesting aspect of almost similar size of cubicle at the top cave and lower cave indicates both the upper and lower caves to have some connection between them. The lower cave also has the provision of carving symbol on the ceiling similar to that seen at the top cave. The caves are supposed to be originally made in 7th-8th century AD.
|
|
|
|
|
|
|
22. Hanuman deity, Nirgude village,Pune district, Western ghats, Maharashtra, India
|
|
|
जुन्नर जवळच्या निर्गुडे गावात मारुतीचे मंदिर आहे. मंदिर १९व्या शतकातले असावे. येथे तीन शिलालेख आहेत. मंदिराच्या बाहेरच्या दगडी भिंतींवर कोरलेले अलंकार व नक्षीकाम आहे.
|
|
The Hanuman temple in Nirgude village is built in 19th century has beautiful simple ornamentation. The temple has three inscriptions. The renovation of the temple has been done recently.
|
|
|
|
References :
Contact me at kale_v@rediffmail.com for any queries and suggestions.
|
|